आलीराजपूर : मंडप एक... नवरदेव एक... पण वधू दोन... पण त्या वधूंचे नावही एक 'शर्मिला'... या तिघांनी सात फेरे घेतले याच्या साक्षीला सर्व गाव उपस्थित होते. आता तिघे एकत्र राहत आहेत. तक्रार न झाल्यामुळे कायदाही काही करू शकत नाही, पण समाजाने या विवाहाचे स्वागत केले आहे.
ही घटना मध्यप्रदेशच्या आलीराजापूर जिल्ह्यातील बोरखड गावात घडली. काही दिवसांपूर्वी रतू पिता दशरिया या २३ वर्षीय तरूणाने आपल्या दोन प्रेयसींसोबत विवाह केला. रतु मजदुरी करून आपले पोट भरतो. तीन वर्षापूर्वी शेजारच्या गाव पलासदा येथील शर्मिलाशी रतुचं सूत जुळलं. नंतर तिला पळवून आणलं आणि पत्नी प्रमाणे घरात ठेवलं. त्यांना दोन मुलंही झालीत. पण गेल्या वर्षी त्याला अजंदा गावातील मजदुरी करणाऱ्या शर्मिलाही आवडली. त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले. तिलाही घरी घेऊन आला आणि दोघांना पत्नीप्रमाणे ठेवले.
आता फक्त या दोन्ही संबंधाना समाज मान्यता देण्यासाठी काही दिवसापूर्वी दोघींशी विवाह केला.
या समाजातील परंपरा वेगळ्या
अभिभाषक संघाचे माजी अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले की, आदिवासी समाजातील अनेक परंपरा आहेत त्यामुळे त्यांना हिंदू विवाह कायद्यापासून दूर ठेवतात. समाज अशा विवाहाला मान्यता आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार असे विवाह बेकायदा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.