नवी दिल्ली : मान्सूनचा काही प्रमाणात मंदावला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. केरळात मान्सूनच आगमन कधी होतंय, याकडे शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रातील मंडळीचं लक्ष लागून आहे.
केरळात ३० मे पर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज यापूर्वी वर्तवण्यात आला होता, पण मान्सून मंदावल्याने केरळात मान्सूनचं आगमन १ जून रोजी होण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. यामुळे हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मान्सूनला आणखी २ दिवस उशीर होणार आहे.
महाराष्ट्रात ७ जून रोजी मान्सूनचं आगमन होतं असं म्हटलं जातं, याच काळात मृग नक्षत्र सुरू होत असतं. या काळात पिकांची पेरणी झाल्यास, ते पिक निरोगी राहण्यास मदत होते, असंही म्हटलं जातं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.