सायंकाळी विवाह, सकाळी घटस्फोट

उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात सायंकाळी विवाह झाला आणि सकाळी घटस्फोट घेण्यात आला. करोंन्दा पछडू या गावात ही घटना घडली. लग्नाच्या आनंदात हे विरजण एवढ्या लवकर का पडलं, याचं कारण समोर आलं आहे.

Updated: May 18, 2016, 08:49 PM IST
सायंकाळी विवाह, सकाळी घटस्फोट title=

बिजनोर : उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात सायंकाळी विवाह झाला आणि सकाळी घटस्फोट घेण्यात आला. करोंन्दा पछडू या गावात ही घटना घडली. लग्नाच्या आनंदात हे विरजण एवढ्या लवकर का पडलं, याचं कारण समोर आलं आहे.

नवरदेवाच्या कुटुंबीयांनी नवरी आणि तिच्या नातेवाइकांनी घरातील १ लाख ४५ हजार रुपयांची चोरी केल्याचा आरोप केला. प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊन पोचले. घटस्फोटामागे घरातील चोरी हे कारण ठरले. अखेर चिडलेल्या नवरीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. 

इम्रान म्हणाला, पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु, पत्नीने घटस्फोट घेण्यासाठी भाग पाडले आहे. दरम्यान, दोन्ही कुटुंबीयांना एकत्र बसवून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.