उत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी

उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Updated: Sep 20, 2016, 05:39 PM IST
उत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश सपा प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी या सर्वांची हकालपट्टी केलीय. या सर्व मुख्यमंत्री अखिलेश समर्थकांवर पक्षाविरोधी कारवाई करण्याच्या आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचा दावा शिवापल यादव यांनी केला आहे.

या कारवाईमुळे मात्र शिवपाल यादव आणि अखिलेश यादव या काका-पुतण्यातला संघर्ष आणखीनच तीव्र होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, याआधी शिवपाल यादव यांनी मुलायमसिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे सर्व सुरळीत असल्याचे चित्र होते. मात्र, आजच्या कारवाईमुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.