नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या पाच शहरांचा यंदा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आलाय. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक आणि औरंगाबादचा समावेश.
यंदा देशभरातून 27 शहरांचा या यादीत समावेश करण्यात आलाय. त्यापैकी महाराष्ट्रातून पाच शहरांची निवड करण्यात आलीय.
केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी ही घोषणा केलीय. कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, नागपूर, ठाणे आणि नाशिक या शहरांना आता ६०० कोटी रूपये मिळणार आहेत. दरवर्षी केंद्राकडून १०० कोटी आणि राज्याकडून १०० कोटी असे २०० कोटी रुपये प्रत्येक शहराला मिळतात. परंतु मागील दोन वर्षांचा बॅकलॉग आणि या वर्षीचा निधी असे मिळून ६०० कोटी रुपये या शहरांना मिळतील. पुढच्या वर्षापासून २०० कोटी मिळणार.
आगरा, अजमेर, अमृतसर, औरंगाबाद, ग्वालियर, हुबली-धरवाड़, जालंधर, कल्याण-डोबिवली, कानपूर, कोहिमा, कोटा, मदुराई, मंगलुरू, नागपूर, नामची, नाशिक, राउरकेला, सलेम, शिवामोगा, ठाणे, थंजावुर, तिरुपति, तुमाकुरु, उज्जैन, वडोदरा, वाराणसी, वैल्लोर यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून 5, तमिलनाडू आणि कर्नाटकमधून 4-4, यूपीमधून 3, पंजाब, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून 2-2, आंध्रप्रदेश, गुजरात, ओडिशा, नागालैंड आणि सिक्किममधून 1-1 शहरांची निवड करण्यात आली आहे.