www.24taas.com, नवी दिल्ली
क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबचा आज सुप्रीम कोर्टात फैसला सुनावला आहे. कुरकर्मा कसाबला फाशी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आता कसाबला फाशी मिळणार म्हणजे मिळणारच हे नक्की झालं आहे. कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मुंबईतल्या २६/११ दहशतवादी हल्लाप्रकरणी कसाबला दोषी ठरवून फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
हायकोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.. या फाशीच्या शिक्षेला कसाबनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं... त्यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार असल्यानं आज सा-याचं देशाचं लक्ष त्याकडं लागून राहिलं होतं..
अनेक निरपराध लोकांचे बळी घेतले त्या कसाबवर आता पर्यंत तब्बल २६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एकाट्या व्हीव्हीआयपीलाही लाजवेल एवढा खर्च कसाबच्या सुरक्षेवर करण्यात आला आहे. आणि माहिती खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे.