उरी चकमकीत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान, आणखी एक जवान शहीद

दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मिरच्या उरी भागातल्या लच्छीपुरात झालेल्या चकमकीत लष्करानं तब्बल दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात एक जवान शहीद झाला. तर आणखी चार ते पाच अतिरेकी लपल्याची शक्यता आहे.

PTI | Updated: Sep 20, 2016, 06:01 PM IST
उरी चकमकीत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान, आणखी एक जवान शहीद title=

उरी : दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मिरच्या उरी भागातल्या लच्छीपुरात झालेल्या चकमकीत लष्करानं तब्बल दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात एक जवान शहीद झाला. तर आणखी चार ते पाच अतिरेकी लपल्याची शक्यता आहे.

दरम्यान, काश्मीमरमधल्या उरीमध्ये पुन्हा एकदा सीमेपलिकडून गोळीबार करण्यात आला आहे. लस्सीपुरामधल्या गोडेतालमधली ही घटना आहे.  हशतवाद्यांचा काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. जम्मू-काश्मिरच्या उरी भागातल्या लच्छीपूरात झालेल्या चकमकीत लष्करानं तब्बल दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. मात्र या चकमकीत एक जवान शहीद झाला. 

दहशतवाद्यांचा सीमेवरून काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न होता. मात्र लष्कराच्या जवानांनी त्यांचा कट उधळून लावत त्यांना यमसदनी पाठवले. अजून सात दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असून त्यांच्यासोबत चकमक सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी उरीत दहशतावद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला केला होता. याआधी केलेल्या हल्यात 18 जवान शहीद झाले होते. त्यानंतर लष्करानं सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला होता.