डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन - मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या काम सुरु होण्याआधीच राजकीय श्रेयाची स्पर्धा लागली आहे. स्मारकासाठी सर्व परवानगी घेऊन भाजप सरकार हे स्मारक पूर्ण करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले. त्याचवेळी काँग्रेस सरकारने पूर्वीच या स्मारकाच्या सगळ्या पूर्तता केल्या आहेत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Updated: Dec 7, 2014, 07:56 AM IST
डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन - मुख्यमंत्री title=

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या काम सुरु होण्याआधीच राजकीय श्रेयाची स्पर्धा लागली आहे. स्मारकासाठी सर्व परवानगी घेऊन भाजप सरकार हे स्मारक पूर्ण करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले. त्याचवेळी काँग्रेस सरकारने पूर्वीच या स्मारकाच्या सगळ्या पूर्तता केल्या आहेत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावीत स्मारकाचं भूमीपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आंबेडकरांना ५८ व्या महापरिनिर्वाणदिनी आदरांजली देण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांचा जणसागर उसळलाय. मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल के विद्यासागर, महापौर स्नेहल आंबेकर, खासदार रामदास आठवले आदीनी आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर उभारणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे हे स्मारक उभारेल, अशी माहिती फडणीस यांनी दिली. मात्र, राजकीय श्रेय लाटण्यासाठी सध्या चढाओढ दिसत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.