नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणांवरुन हा दौरा रद्द होऊ शकतो. २७ तारखेला ओबामा पत्नी मिशेल ओबामा यांच्या सोबत ताजमहल पाहाण्यासाठी जाणार होते.
मात्र झी मीडियाला मिळालेल्या सूत्रांच्या माहिती नुसार हा आग्रा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसांच्या भारतभेटीसाठी उद्या दिल्लीला पोहोचणार आहेत.
खास ओबामांच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीमयुक्त अवॅक्स विमाने आकाशात घिरट्या घालणार आहेत. बॉलिवूडच्या भाषेत सांगायचं तर, 'परिंदा भी पर नहीं मार सकता...' अशी ही सुरक्षाव्यवस्था असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.