दहशतवादी कारवाया : पाकिस्तानला ओबामांनी खडसावले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा दम भरला आहे. ओबामा भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी हल्ला करण्याची योजना अतिरेक्यांची आहे. तशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली असताना ओबामांनी पाकला सांगितले की, दहशतवादी कारवाया थांबवा. अतिरेक्यांना आश्रय देणे कधीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशाच दिला.

Updated: Jan 24, 2015, 10:43 AM IST
दहशतवादी कारवाया : पाकिस्तानला ओबामांनी खडसावले title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा दम भरला आहे. ओबामा भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी हल्ला करण्याची योजना अतिरेक्यांची आहे. तशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली असताना ओबामांनी पाकला सांगितले की, दहशतवादी कारवाया थांबवा. अतिरेक्यांना आश्रय देणे कधीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशाच दिला.

ओबामा यांनी दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय देणे, तसेच अतिरेक्यांचे नंदनवन बनणे खपवून घेतले जाणार नाही, असे खडसावून सांगतानाच त्यांनी मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचे फर्मानच त्यांनी पाकला सोडलेत.

भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एका मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादविरोधी लढ्यातली अमेरिकेची भूमिका स्पष्टकेली. आम्ही दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तानसोबत काम करीत आहोत. मात्र पाकमध्ये दहशतवाद्यांना अभय देण्याची बाब खपवून घेतले जाणार नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी न्यायालयीन खटल्यास सामोरे गेले पाहिजे, असे ओबामा म्हणालेत.

यावेळी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात काही भारतीयांनी जीव गमावला होता, तर २६ /११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अमेरिकी नागरिकही मृत्यूमुखी पडले होते, याकडे ओबामांनी लक्ष वेधले. ओबामांनी ई-मेलद्वारे ही मुलाखत दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.