नवी दिल्ली : सर्वांसाठी घर ही योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याचं नगरविकास मंत्री एम वैकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. भारतातील अंदाजे तीन कोटी जनता घरांशिवाय राहते.
सरकार लवकरच ‘सर्वांसाठी घरा‘ची योजना आणणार आहे, असं सरकारच्या वतीने नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी लोकसभेतील एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात सांगण्यात आलंय.
नायडू पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2022 पर्यंत सर्वांसाठी घर देण्याचे आश्वासन दिले होते. लवकरच याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
सरकार या योजनेकरिता विशेष परिश्रम घेत असून शहरातील गरीबांना घरे देण्यासाठी राज्यशासन खाजगी क्षेत्रांनाही प्रोत्साहित करणार असून त्यासाठी काही शिथीलताही देण्यात येणार आहेत.
सरकार झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचा सरकार सध्या अभ्यास करत असून त्यासाठी तमिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमधील अशा योजनांचा अभ्यास करण्यात येत आहे.
झोपडपट्टीधारकांना त्यांच्या जमिनीएवढ्या जागेवर विनामूल्य घरे बांधण्याच्या योजनेवर नगर विकास मंत्रालय काम करत असून लवकरच अशा विनामूल्य घरांचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.