बाबा रामपालबद्दल 10 धक्कादायक खुलासे

हरियाणाच्या बरवालामधील सतलोक आश्रमामध्ये भक्तीच्या नावाखाली साम्राज्य चालवणारे संत रामपाल आता तुरुंगाची हवा खात आहे. पोलिसांनी त्यांचे शिष्य, सहकाऱ्यांकडून रामपालचे अनेक गुपित उघड करवले आहेत. वाचा रामपालशी निगडीत असे गुपित जे त्यांच्या भक्तांनी आणि सहकाऱ्यांनी उघड केले. 

Updated: Dec 10, 2014, 07:02 PM IST
बाबा रामपालबद्दल 10 धक्कादायक खुलासे

चंदीगढ: हरियाणाच्या बरवालामधील सतलोक आश्रमामध्ये भक्तीच्या नावाखाली साम्राज्य चालवणारे संत रामपाल आता तुरुंगाची हवा खात आहे. पोलिसांनी त्यांचे शिष्य, सहकाऱ्यांकडून रामपालचे अनेक गुपित उघड करवले आहेत. वाचा रामपालशी निगडीत असे गुपित जे त्यांच्या भक्तांनी आणि सहकाऱ्यांनी उघड केले. 

1. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी रामपाल धतूराचं सेवन करायचा. पोलिसांनी चौकशीदरम्यान काळे आणि पांढऱ्या धतूऱ्यानं बनलेली औषधं आणि आणखी दोन-तीन पद्धतीचे औषधं रामपालच्या खाजगी खोलीतून हस्तगत केले. 

2. रामपालच्या आश्रमातील महिला भक्तांमध्ये जास्तीत जास्त महिला या हरियाणा बाहेरच्या आहे, ज्यांना वेगवेगळी कोड नावं दिली गेली होती. चौकशीमध्ये बबिता नावाच्या सेविकेनं सांगितलं रामपालनं तिला कोड नाव बेबी दिलं होतं. 

3. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आपल्या धाडीदरम्यान रामपालच्या आश्रमात काही महिलांना कपड्याविना फिरतांना पाहिलं. 

4. सतलोक आश्रमामध्ये रामपालच्या प्रायव्हेट खोलीत काही महिला सेविकांनाच जाण्याची परवानगी होती. रामपालचा खास सहकारी बलजीतची मुलगी बबिता उर्फ बेबी रामपालची सर्वात जवळची राजदार होती. रामपाल बंद खोलीत बबितासोबत तासंनतास घालवायचा. 

5. पोलिसांना रामपालच्या खोलीतून औषधांसोबतच प्रेग्नेंसी किट सुद्धा मिळालीय. 

6. रामपालची खास आणि राजदार बबिता उर्फ बेबी त्याच्या मुलाच्या खोलीत राहत होती. अजून हे माहिती झालं नाहीय की, बबिताचा रामपालच्या मुलासोबत काय नातं होतं. 

7. रामपाल आणि त्याचा मुलानं बबिताला काही बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकारही दिले होते. इतर सेविकांना मात्र हे अधिकार नव्हते. 

8. सूत्रांनुसार रामपाल बेडमेट म्हणून बबितालाच जास्त पसंत करत असे आणि तिच्या नावावर रामपालनं 10 लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिट सुद्धा केलं होतं. 

9. हरियाणाचे डीजीपी एस. एन. वशिष्ठ यांच्यानुसार रामपालच्या आश्रमातून पोलिसांनी लॅपटॉप, 6 मोबाइल फोन, 10 हार्ड डिस्क, 17 सीडी, तीन टेलिफोन डायरी आणि पाच फाईल्स मिळाल्या.  

10. सूत्रांनुसार पोलिसांना सुरूवातीच्या चौकशीत माहिती मिळाली की, रामपालच्या प्रायव्हेट रूममध्ये काही सेविकांनाही प्रवेश करण्याची परवानगी होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.