व्हिडिओ: नेताजींना काँग्रेसमधून निवृत्त का व्हावं लागलं? - अर्धेंदू बोस

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज पश्चिम बंगाल सरकारने खुल्या केल्या आहेत. या फाईल्समध्ये नेताजींनी केलेलं कार्य तसंच त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही निवृत्ती का घेतली? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. तसंच नेत्यांच्या मृत्यूबाबत असलेलं गूढही उकलण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 18, 2015, 02:09 PM IST
व्हिडिओ: नेताजींना काँग्रेसमधून निवृत्त का व्हावं लागलं? - अर्धेंदू बोस title=

कोलकाता: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज पश्चिम बंगाल सरकारने खुल्या केल्या आहेत. या फाईल्समध्ये नेताजींनी केलेलं कार्य तसंच त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही निवृत्ती का घेतली? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. तसंच नेत्यांच्या मृत्यूबाबत असलेलं गूढही उकलण्याची शक्यता आहे.

नेताजींचे पुतणे अर्धेंदू बोस यांनी झी24तास सोबत बोलतांना सांगितलं की, नेताजींबाबत काय घडलं हे कळण्यासाठी या फाईल्स खूप महत्त्वाच्या आहेत. या 64 फाईल्सनंतर आता पंतप्रधान मोदी केंद्र सरकारकडे असलेल्या 134 फाईल्सही सार्वजनिक करतील अशी अपेक्षा आहे.

ऐका काय म्हणाले नेताजींचे पुतणे - 

 

 

आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.