नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध कॉफी हाऊस सीसीडी अर्थात 'कॅफे कॉफी डे'मधल्या फ्रीजमध्ये झुरळं आढळल्यानंतर एका ग्राहकानं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर सीसीडीचे सोशल मीडियावर धिंदवडे निघालेत. हा व्हिडिओ शूट करताना त्या ग्राहकाला इथं काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यानं थोबाडीत मारलीय.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये ही घटना घडलीय. निखिल आनंद सिंह (@nikhilananad88) यांच्या ट्विटरवरून हा व्हिडिओ २५ मार्च रोजी शेअर करण्यात आलाय. निखिल यांच्या मित्रानं - अर्पण वर्मा यांनी हा व्हिडिओ शूट केलाय.
@CafeCoffeeDay @inconsumerforum @consaff @jagograhakjago A big slap to consumer and consumerism.#bhaagograhakbhago pic.twitter.com/eQQymkR5ad
— Nikhil Anand Singh (@nikhilanand88) March 25, 2017
'व्हिडिओत हे झुरळं लपवण्यासाठी काचेवर मेन्यू कार्ड टाकल्याचं दिसतंय... आणि या मॅडम माझ्यावर ओरडत आहेत... त्यांचा चेहरा पाहा' असं म्हणत अर्पणनं हा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, कॅमेरा रोखण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यानं समोर येऊन अर्पण यांच्या थोबाडीत ठेवून दिली... हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय...