विजय माल्ल्याला आणखी एक धक्का

भारतातल्या 17 बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेल्या विजय माल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे.

Updated: Apr 25, 2016, 07:04 PM IST
विजय माल्ल्याला आणखी एक धक्का title=

नवी दिल्ली: भारतातल्या 17 बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेल्या विजय माल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे. राज्यसभेचा खासदार असलेल्या माल्ल्याची खासदारकी रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव आचारसंहिता समितीनं दिला आहे. 

आचारसंहिता समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष करण सिंग यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत उत्तर द्यायला विजय माल्ल्याला एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. 

प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माल्ल्याला एक आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे, पण त्याची खासदारकी रद्द झालीच पाहिजे, असं वक्तव्य खासदार शरद यादव यांनी केलं आहे.