'OROPसाठी आत्महत्या करणारे रामकिशन काँग्रेस कार्यकर्ते'

OROPच्या मुद्द्यावरून आत्महत्या करणारे रामकिशन ग्रेनवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते

Updated: Nov 3, 2016, 06:55 PM IST
'OROPसाठी आत्महत्या करणारे रामकिशन काँग्रेस कार्यकर्ते' title=

नवी दिल्ली : OROPच्या मुद्द्यावरून आत्महत्या करणारे रामकिशन ग्रेनवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, तसंच काँग्रेसच्या तिकीटावर ते सरपंच झाले होते असा दावा परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी केला आहे. जंतर मंतरवर OROPसाठी झालेल्या आंदोलनाचे रामकिशन हे प्रमुख नव्हते, पण ते सैनिक होते आणि त्यांच्या आत्महत्येमुळे मला दु:ख झालं आहे, असंही व्ही.के.सिंग म्हणाले आहेत.

आत्महत्या करणाऱ्या रामकिशन ग्रेनवाल यांच्या मानसिक संतुलनाविषयी चौकशीची मागणीही बुधवारी व्ही.के.सिंग यांनी केली होती. व्ही.के.सिंग यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण झाला आहे.