एका मुलाचा जन्म, दोन महिन्यांनंतर दुसरा मुलगा

एका मुलाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनंतर पुन्हा दुसऱ्या मुलाचा जन्म... निसर्गाने असा कोणताही करिश्मा नाही केला पण दस्तावेजात दोन भावांच्या जन्म तारिखांच्या विवरणात अशी गडबड झाली आहे. 

Updated: Jan 15, 2015, 09:24 PM IST
एका मुलाचा जन्म, दोन महिन्यांनंतर दुसरा मुलगा title=

बांसवाडा : एका मुलाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनंतर पुन्हा दुसऱ्या मुलाचा जन्म... निसर्गाने असा कोणताही करिश्मा नाही केला पण दस्तावेजात दोन भावांच्या जन्म तारिखांच्या विवरणात अशी गडबड झाली आहे. 

आता ही बाब ग्रामपंचायत निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असलेल्या त्या मुलांच्या वडिलांसाठी खूप मोठी रोडा बनला आहे. या चुकीच्या नोंदीमुळे वडिलांना सरकारी कार्यालयामध्ये आपल्या चपला झिझवाव्या लागत आहे. 

हे प्रकरण गढी पंचायत समिती क्षेत्रातील आहे. पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या मुलांच्या वडिलांनी कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली त्यावेळी हा गोंधळ समोर आला. 

माहितीनुसार मोठ्या मुलांच्या शाळेच्या मायग्रेशन सर्टीफिकेटवर जन्म तारीख २५ जून १९९६ आणि दुसऱ्या मुलाची जन्म तारीख २३ ऑगस्ट १९९६ अशी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्जात मुलांच्या जन्माची तारीख नोंदवावी लागते. या गोंधळामुळे त्यांचे अर्ज रद्द होऊ शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.