जेव्हा मोदींनी गावातील सरपंचासाठी केली धावपळ

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे रूप आपला मतदार संघ असलेल्या वाराणसीच्या जयापूर गावात दिसू आले. यावेळी मोदी यांनी सर्व काही केले जो एक आदर्श वस्तूपाठ होऊ शकतो. यावेळी त्यांनी खऱ्या अर्थाने आपला मोठेपणा दाखविला. खासदार आदर्श ग्राम योजनेतंगर्त जयापूर गावाला दत्तक घेण्यासाठी केले होते. त्यावेळी ‘प्रधान सेवक’ असल्याचे सांगत तसे आपल्या आचरणातूनही त्यांनी दाखवून दिले. 

Updated: Nov 7, 2014, 07:46 PM IST
जेव्हा मोदींनी गावातील सरपंचासाठी केली धावपळ title=

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे रूप आपला मतदार संघ असलेल्या वाराणसीच्या जयापूर गावात दिसू आले. यावेळी मोदी यांनी सर्व काही केले जो एक आदर्श वस्तूपाठ होऊ शकतो. यावेळी त्यांनी खऱ्या अर्थाने आपला मोठेपणा दाखविला. खासदार आदर्श ग्राम योजनेतंगर्त जयापूर गावाला दत्तक घेण्यासाठी केले होते. त्यावेळी ‘प्रधान सेवक’ असल्याचे सांगत तसे आपल्या आचरणातूनही त्यांनी दाखवून दिले.

व्यासपीठावर पंतप्रधान मोदींसह अनेक जण उपस्थित होते. जयापूरच्या सरपंच दुर्गादेवी यांनी जेव्हा भाषण देण्यास सुरूवात केली. परंतु, त्यांची उंची माईकपर्यंत पोहचत नव्हती. त्या कमी उंचीच्या महिला आहेत. यावेळी मोदींना वाटले की कमी उंचीमुळे दुर्गादेवी मायक्रोफोनपर्यंत पोहचू शकत नाही. मोदी स्वतः आपल्या जागेवरून उठले आणि सरपंचासाठी मायक्रोफोन खाली करून दिला. यानंतर माइक खाली आल्याने दुर्गादेवी यांनी व्यवस्थित भाषण देऊ शकल्या. 
या सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांनी पंतप्रधानांच्या हा शिष्टाचाराचे कौतुक केले आणि टाळ्यांचा कडकडाट केला. यानंतर मोदींनी जयापूर सरपंच दुर्गादेवी यांचे कौतुक केले आणि सांगितले दुर्गादेवी वास्तवात देवीचे रूप आहे. त्या आठवी पास आहे पण त्यांचे विचार उच्च आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.