नवी दिल्ली : केंद्र सरकारने ५०० आणि १०००च्या जुन्या नोट चलनातून रद्दबातल करण्याचा निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी दुसरीकडे अनेकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागतेय.
सरकारने ५०० आणि १०००च्या नोटा बदलण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी दिलाय. या कालावधीत जुन्या नोटा बँकेत जमा करुन नव्या नोटा नागरिकांना घेता येणार आहे.
मात्र आजचा दिवस बँका बंद तसेच आज आणि उद्या एटीएम बंद असल्याचे या निर्णयाचा फटका लहान उद्योजकांना होतोय. होलसेल मार्केटवाले, भाजीविक्रेता, किराणा स्टोर्स मालक आणि कामगारांना यांना या निर्णयामुळे समस्यांना तोंड द्यावे लागतेय.
मात्र दुसरीकडे अनेकांची चांदी होणार आहे. एटीएम तसेच बँक बंद असल्याने मोबाईल अॅप द्वारे पेमेंट आणि वॉलेटची सुविधा देणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होतोय. पेटीएम, ऑक्सिजन, मोबिक्विक, फ्रीचार्जयासह अनेक कंपन्यांना मोठा फायदा होतोय. मोदींनी नोटांबाबत घोषणा केल्यानंतर पेटीएमने लगेचच ग्राहकांना नोटिफिकेशन पाठवण्यास सुरुवात केली. मोदींच्या निर्णयामुळे पॅनिक होऊ नका त्या ऐवजी पेटीएम वॉलेटचा वापर करा असं या नोटिफिकेशनमध्ये कंपनीने म्हटलंय.