नवी दिल्ली : मोदी सरकारने मंगळवारी रात्री ५०० आणि १०००च्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.
अर्थ तज्ञांच्या मते सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे लोकांना थोड्याफार समस्येला तोंड द्यावे लागेल. मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फायदा गरीब, मिडल क्लास आणि नोकरपेशा लोकांना होणार आहे.
याचे दोन मोठे फायदे म्हणजे रियल इस्टेटच्या किंमतीत घसरण आणि उच्च शिक्षणासाठी मदत. कारण काळ्या पैशाचा सर्वाधिक वापर लोक प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी करतात. त्यामुळे रिअल इस्टेटच्या किंमती अधिक असतात. मात्र आता असे होणार नाही. ज्यामुळे घरांच्या किंमती घसरतील. तसेच महागाई कमी होण्यासही मदत होतील.