नवी दिल्ली : एका महिलेने आपल्या मुलांसमोर पतीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर पतिच्या शरिराला सेफ्टी टँकमध्ये टाकले. ही घटना दक्षिण पश्चिम दिल्लीच्या नजफगढ भागातील आहे.
कोणाला या घटनेची माहिती होऊ नये यासाठी महिलेने मजुरांच्या सहाय्याने सिमेंटने संपूर्ण टँकला कव्हर केले. १५ ऑगस्टच्या सायंकाळी ही घटना घडली, पण अत्यंत उग्रवास आल्याने हे प्रकरण समोर आले. गुरूवारी मृतदेह सेफ्टी टँकमधून काढण्यात आला.
अधिक वाचा : लव अफेअरची शिक्षा, दोघा भावांनी बहिणीचे मुंडके छाटले
हत्येचे साक्षीदार असलेल्या मुलांना महिलेने काहीही न सांगण्याची ताकीद दिली होती. महिलेने सुरूवातीला हत्या केल्याचा इन्कार केला पण नंतर गुन्हा कबूल केला.
महिलेने आरोप लावला की, तिचा पती तिला शिव्या देत होता. तसेच दारू पिऊन घरी यायचा आणि दररोज मारहाण करत होता. त्याने वैतागून तिने हे पाऊल उचचले आणि त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला.
अधिक वाचा : दीड वर्षांचा चिमुरडा तुरुंगात; भोगतोय आईच्या गुन्ह्याची शिक्षा
घटनेच्या रात्री महिलेने आपल्या पतीचा मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला होता आणि त्याच ठिकाणी झोपली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.