आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये महिलेशी भररस्त्यावर छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचा आरोप आहे की, समाजवादी पार्टीचे नेते अभिनव शर्मा यांच्या बॉडीगार्डने या महिलेला डोळा मारला.
जेव्हा या महिलेने या कृत्याचा विरोध केला, तेव्हा तिचा मोबाईल हिसकावून तोडून टाकण्यात आला. यानंतर या महिलेने समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या गाडीवर चढून आपला विरोध नोंदवला आणि रस्ता जाम झाला, या महिलेचा राग एवढा अनावर झाला की, या महिलेने मर्सिडीज गाडीचा काच फोडून टाकला.
अर्धा तासापासून हा किस्सा सुरूच होता, जेव्हा कारमधील लोकांनी या महिलेले फोनचे पैसे दिले, तेव्हा प्रकरण शांत झालं. साडेसहा हजार रूपयांची भरपाई दिल्यानंतर प्रकरण शांत झालं, या बाबतीत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.