तब्बल एक तास लढून तिनं बिबट्यालाच मारलं

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये 54 वर्षीय एका महिलेनं आपल्या शौर्यानं बिबट्याला मात दिलीय. जवळपास एक तास ही लढाई सुरू होती. शेतात मजूरी करणाऱ्या कमला देवीनं कोयत्यानं आपली आत्मरक्षा करत बिबट्यावर वार केले.

Updated: Aug 25, 2014, 01:24 PM IST
तब्बल एक तास लढून तिनं बिबट्यालाच मारलं title=

रुद्रप्रयाग: उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये 54 वर्षीय एका महिलेनं आपल्या शौर्यानं बिबट्याला मात दिलीय. जवळपास एक तास ही लढाई सुरू होती. शेतात मजूरी करणाऱ्या कमला देवीनं कोयत्यानं आपली आत्मरक्षा करत बिबट्यावर वार केले.

जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू झालाय. तर तीन फ्रॅक्चर आणि 100 टाके लागलेल्या कमला देवींची परिस्थिती सध्या स्थिर आहे. विशेष म्हणजे एवढं जखमी झाल्यानंतरही ही महिला 1 किलोमीटर चालून आपल्या गावी पोहोचली. 

मिळालेल्या माहितीनुसार रुद्रप्रयागच्या कोटी बोडना गावात राहणारी कमला देवी रविवारी सकाळी गावापासून दूर आपल्या शेतावर काम करत होती. दुपारी जेवण्यासाठी ती शेतातून गावाकडे जात असतांना बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला. कमला देवीच्या हातात विळा होता आणि तिनं शौर्यानं कोयत्याचा वापर करून स्वत:चा जीव वाचवला. एवढ्या संघर्षानंतर बिबट्या निघून गेला, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र काही वेळानंतर गावकऱ्यांना बिबट्या मेलेला दिसला. 

कमला देवीचा संघर्ष खूपच मोठा होता. कारण जखमी अवस्थेत पायी चालत त्या गावात पोहोचल्या. गावात प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना श्रीनगरला पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या शरीरावर 100हून अधिक टाके लागलेत. शिवाय डावा हात आणि उजव्या पायाला फ्रॅक्चर आहे. कमला देवीच्या डोक्यावरही गंभीर जखमा झाल्या. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.