व्होट जिहाद होणार असेल, तर हे धर्मयुद्ध आहे; फडणवीसांनी ऑडिओ क्लीप ऐकवत दिला इशारा

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Video : राज्यात विधानसभा निवडणूत तोंडावर असतानाच आता भाजपकडून प्रचारसभांचा धडाका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 16, 2024, 08:49 AM IST
व्होट जिहाद होणार असेल, तर हे धर्मयुद्ध आहे; फडणवीसांनी ऑडिओ क्लीप ऐकवत दिला इशारा  title=
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Devendra Fadnavis On Mulana Audio Clip

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Video : विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच आता प्रत्येक पक्ष आपआपल्या परिनं मतांचं राजकारण करताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेतही मतांचं ध्रुवीकरणावर राजकीय पक्षांची मदार दिसत आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे  प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी राज्य आणि केंद्रातील सरकारवर निशाणा साधल्यानंतर आता भाजपनं यासंदर्भात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. 

हिंदू मतांच्या एकत्रिकारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या आणि महत्त्वाच्या नेत्यांनी 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा देत याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी x च्या माध्यमातून 'यही समय हैं, सही समय हैं, सोए हुए को जगाने का' अशी पोस्ट केल्याने भाजप याबाबत कोणती मोठी भूमिका घेणार का ? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

फडणवीस यांनी पुण्यातील जाहीर सभेत मौलानांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपद्वारे त्यांनी व्होट जिहादच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. तसंच 'निवडणुकीत व्होट जिहाद होणार असेल, तर हे धर्मयुद्ध आहे', असा इशाराही त्यांनी दिला.

'महाराष्ट्रात पराभव झाला, तर दिल्ली सरकार देखील जास्त दिवस टिकू शकत नाही. आमच्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्र सरकार नसून, संपूर्ण देशाची सत्ता आहे. मी काल एका युट्यूब चॅनलच्या मुलाखतीतही हेच म्हणालो होतो ही एक असा व्होट जिहाद आहे ज्याचे सिपेसालार (सेनापती) शरद पवार आहेत. त्यांच्या अझीम शिपायांमध्ये आहेत उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले', असे ऑडिओ क्लीपमधील शब्द ऐकून फडणवीसांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.