अपर्णा यादव यांच्या निमंत्रणानंतर गोशाळेत पोहोचले योगी आदित्यनाथ

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांच्या आग्रहामुळे कान्हा उपवन गोशाळा येथे पोहोचले. ही गोशाळा लखनऊमधील सरोजनीनगर येथे आहे. ही गोशाळा अपर्णा यादव यांची एक एनजीओ चालवते.

Updated: Mar 31, 2017, 04:27 PM IST
अपर्णा यादव यांच्या निमंत्रणानंतर गोशाळेत पोहोचले योगी आदित्यनाथ title=

लखनऊ : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांच्या आग्रहामुळे कान्हा उपवन गोशाळा येथे पोहोचले. ही गोशाळा लखनऊमधील सरोजनीनगर येथे आहे. ही गोशाळा अपर्णा यादव यांची एक एनजीओ चालवते.

अपर्णा यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोशाळेमध्ये येण्यासाठी निमंत्रित केलं होतं. या एनजीओचं संचलन अपर्णा यादव करतात.

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर मुलायम सिंह यांची लहान सून आणि मुलगा प्रतीक यादव योगींना भेटण्यासाठी त्यांच्या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊलला देखील गेले होते. राजकीय क्षेत्रात यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.