www.24taas.com, झी मीडिया, चैन्नई
चेन्नई इथं आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. युवराज सिंगने टीममध्ये कमबॅक केलं आहे.
वेस्ट इंडिजच्या `ए` टीम विरुद्ध आणि चॅलेंजर ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे त्याला टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव टी-२० आणि तीन वन-डेंसाठी धोनीच्या कॅप्टन्सीखाली १५ खेळाडूंची टीम जाहीर करण्यात आली. युवराज सिंग शिवाय उमेश यादव वगळता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आलेल्या प्लेअर्सचा पुन्हा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सिलेक्टर्सनी युवा खेळाडूंना संधी देत अंबाती रायडूसह, मोहम्मद शमी आणि जयदेव उनाडकत या जलदगती गोलंदाजाना संधी दिली आहे.
टीम इंडियात ओपनिंगला शिखर धवन आणि रोहित शर्माची जोडी कायम असून तिस-या स्थानी विराट कोहली असेल. तर सुरेश रैना, युवराज सिंग आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर मिडल ऑर्डरची भिस्त असेल.
स्पिनर रवींद्र जाडेजा, आर. अश्विनसमवेत अमित मिश्राही असेल. तर ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारवर प्रामुख्याने जलदगती गोलंदाजाची भिस्त असेल. याचबरोबर विनय कुमारही टीममध्ये आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सीरिजमध्ये प्रभावशाली कामगिरी करणारे अंबाती रायडू, मोहम्मद शमी आणि जयदेव उनाडकत या नव्या दमाच्या प्लेअर्सनाही संधी देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.