अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा - ओबामा

मंदीच्या तडाख्यात सापडलेली अमेरिका आता मंदीतून बाहेर पडत आहे. तशी कबुली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे. अमेरिकेचे अर्थव्यवस्था मजबूत होत असून, त्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे.

Updated: Feb 4, 2012, 11:48 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

मंदीच्या तडाख्यात सापडलेली अमेरिका आता मंदीतून बाहेर पडत आहे. तशी कबुली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे. अमेरिकेचे अर्थव्यवस्था मजबूत होत असून, त्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे.

सध्या बरोजगारांचा दर ८.३ टक्क्यांवर पोचला आहे. तर जानेवारीमध्ये २.४ लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील नागरिक सतत नवीन नोकऱ्यांच्या शोधात असल्याने आणि एकत्र आल्याने अर्थव्यवस्था बळकटीस फायदा होत आहे. गेल्या २३ महिन्यांमध्ये अमेरिकन नागरिकांसाठी ३.७ मिलियन नोकऱ्या उपबल्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे   देशाची  अर्थव्यवस्था मजबूत होत असताना बेरोजगारांच्या संख्येच्या दरातही घट झाली असल्याचे ते म्हणाले.

जागतिक मंदीमुळे अमेरिकेत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. या मंदीचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. यातून अमेरिकेला बाहेर काढण्याचे आश्वासन बराक ओबामा यांनी निवडणुकीत दिले होते. परंतु आजही ही मंदी काही प्रमाणात अमेरिकेत दिसून येत आहे. त्यामुळे सरकारकडून नागरिकांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे ओबामा यांनी स्पष्ट केले आहे.