www.24taas.com, तैवान
तैवानमध्ये ड्रॅगन ऑफ द इयरसाठी असे हजारो लँन्टर्न आकाशात सोडण्यात आले आणि लँन्टर्न फेस्टिव्हलला सुरूवात झाली. हजारो फ्लोटिंग स्काय लँन्टर्ननी तैवानमधील आसमंत उजळून निघाला होता.
चायनीज नववर्षाच्या पंधरा दिवसांनंतर पौर्णिमेला हा फेस्टिव्हल साजरा केला जातो. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे लँन्टर्न आकाशात दिवे लावून सोडण्यात येतात.आणि नववर्षाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर हा फेस्टिव्हलही संपतो. ड्रॅगन हे तैवानमधील परंपरेचं, उत्कृष्टतेचं, साम्राज्याचं, परिपूर्णतेचं प्रतीक मानलं जातं.त्यामुळे असे मोठमोठे ड्रॅगनच्या आकाराचे लँन्टर्न्स आकाशात सोडले जातात.
सोडण्यात येणाऱ्या लँन्टर्नद्वारे येणारं नववर्ष सुखसमृद्धीचं, भरभराटीचं जावो यासाठी त्यासंदर्भातले संदेश लिहून लँन्टर्न आकाशात सोडले जात आहेत. तैवानमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्येही या लँन्टर्न फेस्टिव्हलचा मोठा उत्साह दिसून येतो. त्यामुळे स्थानिकांसह लँन्टर्न आकाशात सोडण्याचा आनंद पर्यटकही घेताना दिसतात.