ब्रिटनच्या राणीच्या डोळ्यात पाणी

Updated: Dec 4, 2011, 04:51 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आर्थिक मंदीचा फटका केवळ गरिबांना आणि मध्यमवर्गीयांनाच बसतो असा जर तुमचा समज असेल तर पुढे वाच....

ब्रिटनची राणीला देखील २०१५ साला पर्यंत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. ब्रिटन सरकारने काटकसरीची उपाययोजना राबवण्याचे ठरवल्यामुळे राणीच्या पगारात २०१५ साला पर्यंत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. ब्रिटनच्या राजघराण्याला गेली सहा वर्षे उत्पन्नातील कपातीचा सामना करावा लागत आहे. राणीच्या उत्पन्नात २००९ साली घट झाली.

काटकसरीच्या उपाय योजनेमुळे राजवाड्याच्या दुरुस्तीचे काम थांबवण्यात येण्याची शक्यता आहे. आणि त्याप्रमाणे ड्युक आणि डचेस ऑफ कँब्रिजच्या दरबारालाही करदात्यांचे पैसे उपलब्ध होणार नाहीत. प्रिन्स चार्ल्स राजेपदावर आरूढ होई पर्यंत  ड्युक आणि डचेस ऑफ कँब्रिजच्या सेवक वर्गाच्या खर्चाची जबाबदारी प्रिन्स ऑफ वेल्सला उचलावी लागणार आहे.

आता नव्या व्यवस्थेनुसार राणीला क्राऊन इस्टेटच्या फायद्यातील १५ टक्के हिस्सा मिळेल. क्राऊन इस्टेटमध्ये रिजंट स्ट्रीट, विंडसर ग्रेट पार्क आणि देशाच्या अर्ध्याहून अधिक किनारपट्टीचा समावेश आहे.