मुंबई हल्ल्यातील आणखी एकाला अटक

सौदी अरबमध्ये आणखी एक दहशतवादी ताब्यात घेण्यात आलाय. मेहमूद फसिह असं या दहशतवाद्याचं नाव आहे. मुंबई हल्ल्यासह भारताताली अनेक बॉम्बस्फोटात फसिहचा मुख्य सहभाग असल्याचा संशय आहे. फसिहला सौदी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता त्याला भारतात आणण्यासाठी भारत सरकारतर्फे हालचाली सुरू झाल्यात.

Updated: Jul 1, 2012, 02:59 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

सौदी अरबमध्ये आणखी एक दहशतवादी ताब्यात घेण्यात आलाय. मेहमूद फसिह असं या दहशतवाद्याचं नाव आहे. मुंबई हल्ल्यासह भारताताली अनेक बॉम्बस्फोटात फसिहचा मुख्य सहभाग असल्याचा संशय आहे. फसिहला सौदी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता त्याला भारतात आणण्यासाठी भारत सरकारतर्फे हालचाली सुरू झाल्यात.

मुंबई बॉम्बस्फोटासह पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाबाबतही फसिह पोलिसांना हवाय. दरम्यान, सौदी सरकारने फसिहला भारताकडे सोपविण्याची तयारी दर्शवलीये. मात्र, त्यासाठी भारत सरकारने पुरेसे पुरावे द्यावेत, अशी मागणी सौदी सरकारने केलीये.

मूळचा बिहारच्या असणाऱ्या फसीह मेहमूदवर दिल्लीतील जामा मशीदीत बॉम्ब ठेवण्यासाठी आणि बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये स्फोट घडवण्यासाठी पैसे पुरवल्याचा संशय आहे. फसीह मेहमूदला लवकरच भारतात आणलं जाणार आहे. जबीउद्दीन अन्सारीलाही पैसे पुरवणारा फसीह असू शकतो अशी शक्यता सीबीआयनं वर्तवली आहे.

दरम्यान, फसीहला ताब्यात घेण्याआधी त्याच्या परिवारानं गुप्तचर संस्थांवर फसीहला गुपचुप भारतात आणल्याचा आरोप केला होता.  या प्रकरणी फसीहच्या पत्नीनं कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर फसीहला शोधण्याच्या कोर्टाच्या आदेशानुसार फसीहविरोधात सीबीआयनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच नोटीसच्याआधारे सौदीमध्ये स्थानिक तपास यंत्रणेनं फसीहला ताब्यात घेतलं.