लादेन संपला तरी दहशतवाद जिवंत

अमेरिकेकडून केल्या गेलेल्या ओसामा बिन लादेनच्या ऑपरेशनला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीही लादेनचा दहशतवाद संपलेला नाही, तो जिवंत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या अफगाणिस्तानमधील काबुल धमाक्यानंतर हा दहशतवाद आजही डोकेवर काढीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Updated: May 2, 2012, 12:31 PM IST

www.24taas.com, काबूल

 

 

अमेरिकेकडून केल्या गेलेल्या ओसामा बिन लादेनच्या ऑपरेशनला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीही लादेनचा दहशतवाद संपलेला नाही, तो जिवंत  असल्याचे दिसून येत आहे. आजच्या अफगाणिस्तानमधील काबुल धमाक्यानंतर हा दहशतवाद आजही डोकेवर काढीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अमेरिकेने लोदनचा वारसा पुढे नेणाऱ्या जवाहिरीला मारण्याचा विडा उचलला आहे.

 

 

वर्षभरापूर्वी पाकिस्तानातल्या अबोटाबादमधल्या ओसामाच्या गुप्त निवासस्थानावर अमेरिकेनं रेड टाकून, ड्रोन हल्ल्यात ओसामाला ठार मारले होते. ओसामाचा खातमा करताना क्रौयाचे एक जिवंत उदाहरण अमेरिकेनं दफन केलं असलं तरी जगावरचं दहशतवादाचं सावट अजुनही हटलेलं नाही. उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियात दहशतवादी कारवायामध्ये वाढ होत आहे.

 

 

तसचं पाकिस्तानची भूमी दहशतवादासाठी हॉटबेड ठरत असल्याचं मत आता विश्लेषक नोंदवतायंत. ओसामा मेला, पण दहशतवाद जिवंत असल्याच ताज उदाहरण आजच पहायला मिळालं. ओसामामृत्यूच्या वर्षपूर्ती निमित्त अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी अफगाणिस्तानातल्या काबुलला भेट दिली खरी, पण त्यानंतर काही वेळातच तीन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी काबूल हादरलं. ओसामानंतर अलकाईदा काहीशी सौम्य झाली असेल पण तालिबान्यासारखे इतर दहशतवादी पुन्हा प्रखर होत असल्याचं चित्रं आजच्या काबुलधमाक्यानंतर जगासमोर आले आहे.