www.24taas.com, संयुक्त राष्ट्रसंघ
आंतरराष्ट्रीय समुहाद्वारे सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्यावर दबाव टाकण्याची वेळ आली आहे. तसेच, सीरियाच्या नागरिकांना पाठिंबा दर्शविणारा संदेश पाठविला पाहिजे, असे अमेरिकेच्या राज्य सचिव हिलरी क्लिंटन यांनी सांगितले.
आणखी एक लिबिया प्रकरण टाळण्यासाठी अमेरिका आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांनी रशियाला सीरियाचे अध्यक्ष असाद यांच्याविरोधात मसुदा तयार करण्याचे आव्हान दिले आहे. रशिया असादचा कट्टर समर्थक आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या यादवीविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघ कोणतीही कारवाई करू शकते, असा संकेत रशियापर्यंत गेला पाहिजे, हा उद्देश यामागचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मित्र राष्ट्रांना आणि काही सदस्यांना आणखी एक लिबिया होणार असल्याची चिंता सतावत आहे. मात्र, हा चुकीचा समज आहे. आंतरराष्ट्रीस सैन्यदल यात केव्हाही लक्ष घालू शकते, अशी भीती निर्माण केली गेली पाहिजे. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघाच्या कारवाईत अमेरिकेचे सैन्य सहभागी होणार नसल्याचेही हिलरी क्लिंटन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दबावाचे राजकारण असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.