'स्त्री'साठी सगळं काही करायचा आदिमानव

आदिमानव म्हणजे अगदी विचित्र असा आपला समज आहे. मात्र तसे अजिबात नाही. आदिमानव हा आपल्या गरजांनुसार आपल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचा.

Updated: Jul 23, 2012, 06:22 PM IST

www.24taas.com, लंडन

 

आदिमानव म्हणजे अगदी विचित्र असा आपला समज आहे. मात्र तसे अजिबात नाही. आदिमानव हा आपल्या गरजांनुसार आपल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचा. आदिमानवाबाबत आतापर्यंत असे मानले जात होते की ते केवळ भाला घेऊन शिकार करण्यात आपला सारा वेळ घालवत असत, परंतु वैज्ञानिकांचे म्हणणे मात्र वेगळेच आहे.

 

त्यांच्या मते आदिमानव खूप कुटुंबवत्सल होते. ते त्यांचा महिलांना जास्तीत जास्त मदत करायचे. त्यांच्या महिला ह्या त्यांना अत्यंत महत्त्वाच्या होत्या असे दिसून येते. घरात राहून कुटुंबाची जबाबदारीही उचलायचे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासंबंधी संशोधनही केले आहे. त्यामुळे आपले पूर्वज आपला जास्तीत जास्त वेळ घरातील मोठी जबाबदारी पार पाडण्यात व्यतित करायचे हे विसरू नका!

 

निएंडरथल म्हणजेच आदिमानवाच्या अवशेषावरून समजले आहे की, त्यांचा उजवा हात डाव्या हाताच्या तुलनेत खूप मोठा आणि पन्नास टक्के जास्त ताकदवान होता. सुरुवातीला असे मानले जायचे की ते भाल्यांनी शिकारीचे काम करायचे म्हणून त्यांचा हात तसा झाला असावा.