रमजानच्या महिन्यात ॐ लिहिलेल्या चपलांची विक्री

पाकिस्तानातील सिंध प्रांतात काही दुकानदारांनी ॐ अक्षर असेल्या चपला विकल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानातील हिंदू समाजाने यावर आक्षेप घेतला असून नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Jun 20, 2016, 02:07 PM IST
रमजानच्या महिन्यात ॐ लिहिलेल्या चपलांची विक्री title=

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात काही दुकानदारांनी ॐ अक्षर असेल्या चपला विकल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानातील हिंदू समाजाने यावर आक्षेप घेतला असून नाराजी व्यक्त केली आहे. ॐ ला हिंदू समाजात पवित्र स्थान आहे त्यामुळे चपलांवर ॐ असणे हे दुर्देव आणि ईश्वराचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी पाकिस्तान हिंदू परिषदेचे मुख्य संरक्षक रमेश कुमार यांनी स्थानिक अधिकारी आणि सिंध सरकार यांच्याविरूद्ध निषेध दर्शविला. कुमार यांनी सांगितले की हे दुदैवी आहे की सिंधमधील स्थानिक दुकानदार ईदच्या वेळी ॐ लिहिलेल्या चप्पल विकायला ठेवतात. यामागे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.

हिंदू समाजातील काही लोकांनी या चप्पलांचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत आणि त्यांना दुकानातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. अशा चप्पलांची विक्री हा पाकिस्तानातील हिंदू समाजाचा अपमान असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे लवकरात लवकर त्या दुकानातून काढून टाकण्यात यावेत, असे कुमार यांनी यावेळी सांगितले.