व्हेनिझुएला : उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर साऱ्या जगात पाकिस्तानची छि थू सुरू झाली आहे. अलिप्ततावादी राष्ट्रांच्या व्हेनिझुएलामध्ये भरलेलेल्या परिषदेत 120 पैकी 118 देशांनी भारताच्या दहशतवादविरोधी प्रस्तावाचं समर्थन केलंय. तिकडे पाकिस्ताननं याच मंचावरून काश्मीरचा विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण याप्रयत्नात पाकचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांना फारसं यश आलेलं नाही. उलट भारताच्या बाजूनं मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला मोठा पाठिंबा मिळाला आहे.
भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनीही या मंचावरून पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. शांती प्रक्रियेमध्ये दहशतवादाला समर्थन करून काश्मीरमध्ये विष पसरवणाऱ्या पाकिस्तानला त्याची किंमत मोजावी लागेल असं अकबर यांनी म्हटलंय.