सिंगापुरात 13 भारतीयांना 'झिका'ची लागण

सिंगापूर शहरात राहणाऱ्या 13 भारतीय नागरिकांना 'झिका' विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय दुतावासाकडून अधिकृत मिळाली आहे.

PTI | Updated: Sep 1, 2016, 03:13 PM IST
सिंगापुरात 13 भारतीयांना 'झिका'ची लागण title=

क्वॉलालंपूर : सिंगापूर शहरात राहणाऱ्या 13 भारतीय नागरिकांना 'झिका' विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय दुतावासाकडून अधिकृत मिळाली आहे.

डासांपासून होणाऱ्या या आजाराची लागण सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. सोमवारी सुमारे 450 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यात 56 हून अधिक जणांना झिकाची लागण झाल्याचे पुढे आले.

'झिका'ची लागण झालेल्यांपैकी 13 जण  भारतीय आहेत. दरम्यान, परदेशी नागरिकांचा अधिक समावेश आहे. आतापर्यंत सिंगापूरमध्ये 115 जणांना झिकाची लागण झाली आहे. झिकाची लागण झालेले भारतीय नागरिक हे बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे.