ऑस्ट्रेलियात २ भारतीयांना बलात्कार प्रकरणी अटक

‘टॅंगो चॅट` या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी २ भारतीयांना ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. अजितपालसिंग (३१) आणि रणधीरसिंग (२१) ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Updated: Oct 14, 2013, 01:05 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, मेलबर्न
‘टॅंगो चॅट` या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी २ भारतीयांना ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. अजितपालसिंग (३१) आणि रणधीरसिंग (२१) ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अजितपालसिंगने एका २४ वर्षीय विवाहितेसोबत मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख वाढविली आणि त्यानंतर या महिलेला भेटायला बोलावून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर महिलेला ब्लॅकमेल करत त्याचा मित्र रणधीरसिंगनेही बलात्कार केला.
या प्रकरणी पोलिसांनी अजितपालसिंग आणि रणधीरसिंग अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एका आरोपी असल्याचा पोलिसांचा कयास असून त्याचा शोध सुरू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.