एका दिवसात उद्योजकाचे २ खरब रूपये बुडाले!

दोन खरब रूपये, विचार करा एवढ्या पैशांमध्ये तुम्ही काय काय खरेदी करू शकतात. जर तुमच्याकडे एवढे पैसे असतील आणि हे पैसे एकाच दिवसात बुडून गेले तर काय करणार, विचार करा, पण चीनमध्ये हे घडलंय.

Updated: Aug 26, 2015, 02:45 PM IST
एका दिवसात उद्योजकाचे २ खरब रूपये बुडाले! title=

बिजिंग : दोन खरब रूपये, विचार करा एवढ्या पैशांमध्ये तुम्ही काय काय खरेदी करू शकतात. जर तुमच्याकडे एवढे पैसे असतील आणि हे पैसे एकाच दिवसात बुडून गेले तर काय करणार, विचार करा, पण चीनमध्ये हे घडलंय.

चीनमधील शेअर बाजारात झालेल्या हाहाकारात एका श्रीमंत व्यक्तीला एका दिवसात 3.6 अब्ज डॉलर म्हणजे दोन खरब रूपयांचं नुकसान झालं आहे.

सोमवारी चीनचा शेअर बाजार कोसळला, त्यात वैंग जियानलिन यांनी आपल्या कमाईतला १० टक्के हिस्सा एका दिवसात सोडावा. ही रक्कम त्यांची एका वर्षाची कमाई होती.

जगातील सर्वात श्रीमंत लोकांचा अभ्यास करणारी ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सने ही माहिती दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.