२६/११ मुंबई हल्ला : दाऊद इब्राहिमच्या संपर्कात ६ भारतीय नेते

अमेरिकेतल्या दी संडे गार्डियननं २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. अमेरिकेतल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या एका वृत्तात २६/११ हल्ल्यापूर्वी भारतातले ६ बडे नेते दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. 

Reuters | Updated: Jul 29, 2015, 11:20 PM IST
२६/११ मुंबई हल्ला : दाऊद इब्राहिमच्या संपर्कात ६ भारतीय नेते title=

न्यूयॉर्क : अमेरिकेतल्या दी संडे गार्डियननं २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. अमेरिकेतल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या एका वृत्तात २६/११ हल्ल्यापूर्वी भारतातले ६ बडे नेते दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. 

यात चार यूपीएचे तर दोन एनडीएचे नेते आहेत. २६/११नंतर यातल्या ५ नेत्यांनी दाऊदशी संपर्क तोडला मात्र एक नेता २०११पर्यंत दाऊदच्या संपर्कात होता, असा दावा द गार्डियननं केला आहे.

मुंबईवर झालेला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला यशस्वी होण्यासाठी दाऊदचे मुंबई पोलीस आणि हाय प्रोफाईल नेत्यांशी असलेले संबंध कारणीभूत असल्याचंही या वृत्तात म्हटलंय.

२६/११हल्ल्याच्या देशांतर्गत तपासावर अधिक लक्ष न देण्यामागे हेच कारण असल्याचं गार्डियननं म्हटलंय. पाकिस्तानातल्या हँडलर्सना हॉटेलांची सविस्तर माहिती देणारे ताज हॉटेलचे दोन आणि ट्रायडेण्टच्या एका कर्मचाऱ्याची चौकशीच केली गेली नाही, हल्ल्यानंतर हे लोक हॉटेलमध्ये काम करतच होते, असंही या बातमीमध्ये म्हटलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.