मुंबई हल्ल्यातील सूत्रधार लख्वी अखेर तुरूंगाबाहेर

मुंबई हल्ल्यातील सूत्रधार लख्वीचा तुरूंगाबाहेर येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Updated: Dec 29, 2014, 08:41 PM IST
मुंबई हल्ल्यातील सूत्रधार लख्वी अखेर तुरूंगाबाहेर title=

इस्लामाबाद : मुंबई हल्ल्यातील सूत्रधार लख्वीचा तुरूंगाबाहेर येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या झाकी उर रहमान लख्वी याला सार्वजनिक शांतता आदेश (एमपीओ) अंतर्गत तुरुंगातच ठेवण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगित केला.

 न्या. नूर उल हक कुरेशी यांनी हा आदेश स्थगित करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशांमुळे लख्वीचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लख्वी याला इस्लामाबादच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने पुराव्याअभावी जामीन मंजूर केला होता. मात्र, सार्वजनिक शांतता आदेश अंतर्गत पुन्हा तीन महिने तुरुंगवासात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. 

या आदेशांविरोधात लख्वीच्या वकिलांनी पुन्हा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यामध्ये न्यायालयाने त्याला दिलासा देणारा निर्णय दिला.

मुंबई हल्ला २६ नोव्हेंबर २००८ रोजी झाला होता व त्यात १६६ जण मृत्युमुखी पडले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.