मंदिरातल्या फ्रीजरमध्ये सापडले वाघांचे 40 मृत बछडे

थायलंडच्या एका बौद्ध मंदिरातल्या फ्रीजरमध्ये वाघांचे 40 मृत बछडे सापडले आहेत.

Updated: Jun 1, 2016, 07:35 PM IST
मंदिरातल्या फ्रीजरमध्ये सापडले वाघांचे 40 मृत बछडे title=

बँकॉक : थायलंडच्या एका बौद्ध मंदिरातल्या फ्रीजरमध्ये वाघांचे 40 मृत बछडे सापडले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यानंतर मंदिरातल्या इतर वाघांना तिथून हटवण्याचं काम सुरु केलं आहे. 

या मंदिरावर वाघांना त्रास देणं आणि वन्य जिवांची तस्करी केल्याचा आरोप होत होता, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. थायलंडच्या कंचनाबुरी भागामध्ये असलेल्या या मंदिरामध्ये तब्बल 137 वाघ आहेत. यापैकी तीन वाघांना मंदिरातून बाहेर काढण्यात यश आलं आहे. या वाघांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. 

मंदिरामध्ये असलेल्या भिक्षूंनी हे वाघ बाहेर काढायला विरोध केला, पण कोर्टाचा निर्णय दाखवल्यानंतर मात्र त्यांचा विरोध कमी झाला. थायलंडमध्ये असलेलं हे वॉट फा लुआंग बुआ मंदिर टायगर टेंम्पल म्हणूनही ओळखलं जातं. हे मंदिर एक प्रसिद्ध पर्यटन स्थळही आहे.