मुंबई : फोटोमध्ये जो कुत्रा दिसतोय तो पुतळा वाटत असला तरी तसं नाही आहे. तो खरोखरचा कुत्रा आहे. हा कुत्रा खूपच आळशी आहे. तो २२ तास झोपतो. अनेकदा तर तो स्वत:च्याच सावलीने घाबरुन जातो.
ब्रिटेनमधील साऊथ वेल्सच्या पेनमाएनमध्ये राहणाऱ्या या कुत्र्याचं नाव मेजर आहे. त्याची उंची ७ फूट आणि वजन ७६ किलो आहे. हा जगातील सर्वात उंच कुत्रा असल्याचं याचे मालक ब्रायन आणि जूली विलियम्स म्हणतात. याची उंची अजून वाढत असून लवकरच त्याचं नाव गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकार्ड्समध्ये येणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
७ फुटाचे आणखी २ अन्य कुत्रे देखील अस्तित्वात आहेत. एक एसेक्समध्ये तर दूसरा अमेरिकेत आहे. अमेरिकेचा ग्रेट डेनचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवलं गेलं आहे.