नवी दिल्ली : सौदी अरेबियातल्या जेद्दा शहरातले सुमारे 800 भारतीय कामगार बेरोजगार झाले आहेत. या बेरोजगार भारतीयांना भारत सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचं, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे.
या भारतीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या भारतीयांना अन्न पुरवण्याचे आदेश सुषमा स्वराज यांनी सौदीतल्या भारतीय दुतवासांना सांगितलं आहे. तसंच परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंग ही परिस्थिती हाताळण्यासाठी सौदीला रवाना होणार आहेत.
सौदी अरेबियातल्या कंपन्यांच्या मालकांनी कंपन्यां बंद केल्या, यामुळे या भारतीयांवर बेरोजगार व्हायची वेळ आली आहे. या कंपन्यांच्या मालकांनी कामगारांचे पगारही दिले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.