लंडन : आपण ज्याप्रकारचे स्वातंत्र्य दिवसाढवळ्या अनुभवतो त्यामुळे आपल्याला इतर देशांत सरकारमार्फत देशांतील लोकांवर कोणत्या प्रकारचे अत्याचार केले जातात याची अनेकदा कल्पनाही नसते. आपण अनुभवत असलेले नागरी जीवन, स्वातंत्र्य, कायदेव्यवस्था याची अनेकदा आपल्याला किंमत नसते. जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत जिथे या गोष्टी दररोज पायदळी तुडवल्या जातात.
यापैकी एक देश म्हणजे सौदी अरेबिया. इथे असलेली राजेशाही आजही जगातील सर्वाधिक क्रूर सत्तांपैकी एक आहे. या देशात आजही जंगलातील कायद्याचे राज्य आहे का, असा संशय येथील काही घटना पाहिल्यावर येतो.
एका डॉक्युमेंट्री फिल्म मेकरने नुकत्याच तयार केलेल्या एका डॉक्युमेंट्रीत त्याने या देशातील क्रूर राजवटीचे अनेक खुलासे केले आहेत.
चोरी, दरोडा अशा घटना तर जगात सर्वत्र घडतात. पण, सौदी अरेबियामध्ये मात्र या गुन्ह्यांसाठी सरळ फाशीची शिक्षा आहे. या डॉक्युमेंट्रीत अशाच एका फाशीचे चित्रीकरण आहे. पाच चोरांच्या एका टोळीने चोरी केल्याबद्दल त्यांना भर चौकात फासावर लटकवण्यात आले. लोकांनी असा गुन्हा करू नये म्हणून एका चौकात तीस फूटांवर त्यांचे मृतदेह सर्वांना पाहण्यासाठी लटकवण्यात आले.
एका महिलेला देण्यात आलेल्या देहदंडाच्या शिक्षेचे दृष्यही यात आहे. या महिलेवर तिने तिच्या सावत्र मुलीचा खून केल्याचा आरोप होता. एका भर चौकात सर्वांच्या समक्ष या महिलेचं मुंडकं शरीरापासून एका तलवारीच्या घावाने कलम करण्यात आले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही मुलगी 'मी हा गुन्हा केला नाही' असे ओरडताना दिसते.
या महिलेला ज्या चौकात शिक्षा देण्यात आली त्याला उपरोधाने 'चॉपचॉप स्क्वेअर' म्हणजेच 'कापाकापी चौक' म्हणून ओळखले जाते. कारण, या चौकात दर महिन्याला शेकडो जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. या चौकात इतके रक्त सांडते की भारतात ज्याप्रमाणे सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था केलेली असते त्याप्रमाणे या चौकात लोकांचे रक्त वाहून जाण्याची व्यवस्था केली आहे.