व्हिडीओ : पँटच्या खिशातच फोनने घेतला पेट

हल्ली स्मार्टफोनचे स्फोट होण्याच्या घटना वारंवार घडतायत. चार्जिंग सुरु असताना अनेकदा फोनचा स्फोट झाल्याचा बातम्या आपण ऐकतो. 

Updated: Mar 21, 2016, 11:52 AM IST
व्हिडीओ : पँटच्या खिशातच फोनने घेतला पेट title=

इस्लामाबाद : हल्ली स्मार्टफोनचे स्फोट होण्याच्या घटना वारंवार घडतायत. चार्जिंग सुरु असताना अनेकदा फोनचा स्फोट झाल्याचा बातम्या आपण ऐकतो. मात्र खिशात असलेल्या फोनने अचानक पेट घेतल्याची घटना पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये घडलीये. व्हिडीओ बातमीच्या खाली दिला आहे. 

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक तरुण बसमधून खाली उतरवतो. जेव्हा तो रस्त्यावर चालू लागतो तेव्हा खिशात आग लागल्याचे त्याच्या लक्षात येत नाही. मात्र आग पटकन वाढत जाते आणि आगीच्या विळख्यात तो सापडतो. हा सर्व प्रकार एका कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. 

यादरम्यान एका माणसाने प्रसंगावधाना राखत त्या तरुणाच्या अंगावर बादलीभर पाणी ओतले आणि आग विझवली. पाहा हा संपूर्ण व्हिडीओ.