रोम : जगातील सर्वात वृद्ध महिला एमा मोरॅनो यांचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले. एमा मोरॅनो एकोणिसाव्या शतकात जन्माला आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १८९९ रोजी इटलीमधील वर्बानिया येथे झाला होता. एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या व्यक्तींमधील त्या एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी तीन शतके पाहिली.
मोरॅनो त्यांच्या आठ भांवडांत सर्वात मोठ्या होत्या. त्यापैकी त्या एकट्याच हयात होत्या. त्यांची अनुवांशिकता आणि नियंत्रित डायटमुळे त्यांना दिर्घायुष्य लाभल्याचे म्हटले जाते. त्यांची आई ९१ वर्ष तर त्यांच्या काही बहिणी १०० वर्षांपर्यंत जगल्या. मोरॅनो ९० पेक्षा जास्त वर्ष डायट करत होत्या. त्यामध्ये त्या रोज तीन अंडी खायच्या. त्यातील दोन अंडी कच्ची असायची.