मुंबई : चंद्रावर जायची संधी तुम्हाला अमेझॉनकडून मिळू शकते. होय, तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी तुम्हाला लवकरच चंद्रावरही मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी 'स्पेसएक्स'चे अध्यक्ष ऐलन यांनी काही ग्राहकांना चंद्रावर ट्रिपसाठी पाठवण्याची घोषणा केली होती. आता अमेझॉनचे अध्यक्ष बेजस यांच्या घोषणेनुसार, चंद्रावरही ग्राहकांना त्यांनी विकत घेतलेलं सामान पोहचवण्यात येणार आहे.
खाजगी क्षेत्राला चंद्रावर प्रवेश देण्यासाठी 'कमर्शिअल लूनर कार्गो डिलिव्हरी सर्व्हिस' नासाला सुरू करावी लागेल, असं बेजस यांनी म्हटलंय. 2020 सालापर्यंत जवळपास 4500 किलो सामान चंद्रावरही पोहचवण्याची व्यवस्था सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
वेळ आलीय जेव्हा अमेरिका फक्त चंद्रावर जाणारच नाही तर तिथं वस्तीही उभारू शकेल, असं बेजस यांनी म्हटलंय.