रशियातल्या दोन मेट्रो स्टेशनवर स्फोट, १० जणांचा मृत्यू

रशियात दोन मेट्रो स्टेशन्सवर स्फोट झाला आहे. सेंट पीटर्सबर्ग मेट्रो स्टेशनवर झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त रशियन माध्यमांनी दिलंय.

Updated: Apr 3, 2017, 06:47 PM IST
रशियातल्या दोन मेट्रो स्टेशनवर स्फोट, १० जणांचा मृत्यू  title=

मॉस्को : रशियात दोन मेट्रो स्टेशन्सवर स्फोट झाला आहे. सेंट पीटर्सबर्ग मेट्रो स्टेशनवर झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त रशियन माध्यमांनी दिलंय.

या स्फोटात अनेक जण जखमी झालेत. स्फोटाच्या घटनेनंतर सेंट पीटर्सबर्गमधील मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन शहरात असून त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. हा बॉम्बस्फोट असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.