नायजेरियात मशिदीत स्फोट, १२० ठार, २७० जखमी

भाविक शुक्रवारची नमाज अदा करीत असतानाच नायजेरियातील सर्वात मोठय़ा मशिदीवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यात कमीत कमी १२० जण मारले गेले, तर अन्य २७० जण जखमी झाल्याचं मदत पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

AFP | Updated: Nov 29, 2014, 08:31 AM IST
नायजेरियात मशिदीत स्फोट,  १२० ठार, २७० जखमी title=

लागोस: भाविक शुक्रवारची नमाज अदा करीत असतानाच नायजेरियातील सर्वात मोठय़ा मशिदीवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यात कमीत कमी १२० जण मारले गेले, तर अन्य २७० जण जखमी झाल्याचं मदत पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

प्रत्यक्षदर्शीच्या मते, तीन वेळा हल्ल्याचा प्रचंड आवाज आला. एवढंच नाही, तर बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबारही केला. महत्वाचं म्हणजे ही मशिद कानो शहराचे अमीर मुहम्मद सानूसी यांच्या राजवाड्याजवळ आहे. 

कानो शहराच्या अमीरनं दहशतवादी संघटना बोको हराम विरोधात उभं राहण्याचं नागरिकांना आवाहन केलं होतं. त्यामुळंच हा बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याची शक्यता नायजेरीयन पोलिसांकडून व्यक्त केली जात आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.