www.24taas.com, एडिंबरो
युरोपमध्ये स्कॉटलंडच्या एडिंबरा भागामध्ये एका भारतीय तरुणावर वर्णद्वेषातून हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्कॉटलंड येथे रविवारी एक २८ वर्षीय भारतीय तरुण आपल्या दोन मित्रांसह प्रिंसेस स्ट्रीटवर फिरत असताना त्याच्यावर एका स्कॉटिश तरुणाने वर्णद्वेषातून हल्ला केला. या २८ वर्षीय तरुणाजवळ उंच धिप्पाड स्कॉटिश तरुण आला, त्याने वंशिक शिवागाळ करत भारतीय तरुणाच्या चेहऱ्यावर हाताने आघात केला आणि लगेच पळून गेला.
भारतीय तरुणाच्या चेहऱ्यावरील जखमांचे रुग्णालयात उपचार होत आहेत. पोलीस या वंशद्वेषी स्कॉटिश तरुणाचा शोध घेत आहेत. यापूर्वीही २०११ मध्ये ब्रिटनमध्ये पुण्यातील विद्यार्थी अनुज बिडवे याची वर्णद्वेषातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.